संगमेश्वर : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना संगमेश्वर तालुक्यातून असंख्य पत्रे पाठविण्यात आली आहेत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
संगमेश्वर : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना संगमेश्वर तालुक्यातून असंख्य पत्रे पाठविण्यात आली आहेत.
चिपळूण : मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २ एप्रिल) येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. येत्या जानेवारीपासून मुंबई ते गोवा हे अंतर या महामार्गावरून साडेचार तासांत कापणे शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ३० मार्च २०२३ रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची (NH 66) हवाई पाहणी केली. त्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत होते.
आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दल आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…
देवरूख : प्रसिद्ध युवा व्याख्याता आणि सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर येत्या ७ एप्रिल रोजी देवरूख येथे दोन मोफत स्पर्धा परीक्षा व्याख्याने देणार आहेत.