अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे १७ मार्चला प्रकाशन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी, दि. १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध संपादक व चतुरस्र वक्ते उदय निरगुडकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या संस्थात्मक जीवनातील अनुभवांवर आधारित ‘सहकार स्वरूपा’ (अनुभवांचा सहकार प्रवास) हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. पुस्तकाचे शब्दांकन प्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला यांनी केले असून राजहंस प्रकाशन (पुणे) यांनी ते प्रकाशित केले आहे. पुस्तकात सहकार क्षेत्रातील कार्य, संस्थात्मक प्रवास तसेच सामाजिक क्षेत्रातील अनुभव यांचा आढावा मांडण्यात आला आहे. अ‍ॅड. पटवर्धन यांचे अनुभवकथन मुख्यतः सार्वजनिक जीवनात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आहे. जिद्दीचा आधार घेऊन नेकीने व नेटाने प्रयत्न केले, तर समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता येऊ शकते हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी हे अनुभवकथन आहे. नगर वाचनालय आणि सहकार क्षेत्रात केलेले कार्य या पुस्तकातून समोर आणले आहे. अनुभवकथनातून अनेक प्रसंग, संघर्ष आणि यशाची कहाणी उलगडत जाते. समाजातील कार्यकर्त्यांनी केलेले काम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.
पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी, दि. १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू आणि पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply