रत्नागिरी : ‘हापूस अॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत मुंबईसारख्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या ३ कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे प्रयत्न आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : ‘हापूस अॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत मुंबईसारख्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या ३ कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे प्रयत्न आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (४ मार्च) करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार ४१ झाली आहे. आज २१ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे २० बाधित आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. एकाचा मृत्यू नोंदविला गेला.
रत्नागिरीच्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ एक मार्च २०२१ रोजी झाला.
रत्नागिरी : मधुमेही व्यक्तींना होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथीसह विविध नेत्रविकारांची तपासणी रत्नागिरीत ५ आणि ६ मार्चला होणार आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही विशेष तपासणी केली जाणार असून जिल्ह्यातील मधुमेही नेत्ररुग्णांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम आजपासून सुरू करत आहोत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. गीता जयंतीपासून झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.