गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी शहरात ई-यंत्रण अर्थात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे.