तळेरे (ता. कणकवली) : जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन उद्या (दि. २३ जानेवारी) करण्यात आले आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
तळेरे (ता. कणकवली) : जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन उद्या (दि. २३ जानेवारी) करण्यात आले आहे.
रत्नागिरी : येथील धन्वंतरी धर्मादाय संस्थेमार्फत रत्नागिरीत परकार हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्र सुरू आहे. तेथे आज, २१ जानेवारी रोजी विविध गटाच्या २४ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत.
रत्नागिरी : पहिल्या सागर महोत्सवातील वाळूशिल्प प्रदर्शनात लतादीदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सैनिक आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी (दि. २२ जानेवारी) दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
चिपळूण : उद्या (दि. २२ जानेवारी) आकाशात शुक्र आणि शनी ग्रहांच्या युतीचा विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन चिपळूण येथील तारांगण ग्रुपचे दीपक आंबवकर यांनी केले आहे.
कोकणात अनेक कारणांमुळे भात या मुख्य पिकाच्या लागवडीमध्येच घट झाल्यामुळे नाचणीची लागवडही थांबली आहे. या पिकांचे खाद्यपदार्थांमधील महत्त्व पटवून देत असताना या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा वाढावा यासाठी प्रामुख्याने प्रयत्न व्हायला हवेत. स्थानिक गरजा आणि समस्या लक्षात घेऊन त्यासाठी कोकणाकरिता स्वतंत्र धोरण आखावे लागेल. तशी धोरणे वर्षभरात ठरविली गेली, तरी भरडधान्य वर्ष साजरे केल्यासारखे होईल.