रत्नागिरीत २४ तासांत ९६ नवे रुग्ण; चार मृत्यू; मृत्युदर ३.४९ टक्के

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १२) चौघा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील तीन, तर चिपळूण तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या ८७ झाली असून, जिल्ह्याचा करोनाचा मृत्युदर ३.४९ टक्के झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९६ नवे बाधित रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४८७ झाली आहे. बरे झालेल्यांची संख्या १६१६ झाली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६४.९७ टक्के आहे.

वाचन चालू ठेवा

स्वातंत्र्याचे पूर्वरंग : चतुरंगचा कीर्तन जुगलबंदी उपक्रम यंदा फेसबुकवर

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री स्वातंत्र्याचे पूर्वरंग हा उपक्रम चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जातो. हा उपक्रम दीर्घ काळ चिपळूणमध्ये, तसेच गेली दोन वर्षे रत्नागिरीमध्ये साजरा झाला आणि त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम प्रत्यक्ष आयोजित करणे शक्य नसल्याने फेसबुक लाइव्हद्वारे त्याचे प्रसारण केले जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच कीर्तनचंद्र श्रेयस बडवे आणि कीर्तनचंद्रिका मानसी बडवे यांची कीर्तन जुगलबंदी या वेळी सादर होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत नवे १०१ करोनाबाधित; तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (११ ऑगस्ट) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे १०१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३९१ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या ५२२ झाली आहे.

ओव्या, फुगड्यांच्या गाण्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी शकुंतला शिंदे यांचे निधन

रत्नागिरी : खोरनिनको (ता. लांजा) येथील जुन्या पिढीतील ओव्या, फुगड्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी श्रीमती शकुंतला दत्ताराम शिंदे (वय ७२ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे यंदाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने २०२० सालचे विविध पुरस्कार आज (११ ऑगस्ट) जाहीर केले. कोणतेही अर्ज न मागवता विविध माध्यमांतून माहिती मिळवून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पत्रकार अरुण आठल्ये, डॉ. बाळकृष्ण पाध्ये, कीर्तनकार अनंत कर्वे, उद्योजक विनायक वाकणकर, वेदमूर्ती सुयोग पाध्ये आणि शिक्षिका सौ. अनघा प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.

1 2 3 65