दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार असून, रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातला पहिला मतदारसंघ बनला आहे.
देवरूख : धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करत असताना इतिहास ग्रंथांमध्ये नोंद असलेले १६६६ मधील ‘Battle of Devrukh’ हे देवरूखच्या शिवकालीन इतिहासाविषयीचे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक प्रकरण संशोधकांच्या लक्षात आले आहे.
मालवण : माझी मालवणी कविता मालवणी मातीतच रुजून आली. म्हणूनच तिच्यात मालवणी माणसांची सुखदुःखे, त्यांचा इरसालपणा दिसून येतो. दारिद्र्यातही विचारांची श्रीमंती देणारी माझी आई माझ्या प्रत्येक कवितेची मूलस्रोत आहे, असे उद्गार मालवणी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांनी काढले.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता २०२६-२७च्या हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळपीकविम्याचा हप्ता प्रति हेक्टर १३,६०० रुपयांऐवजी हेक्टरी ८५०० रुपये इतका करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.