रत्नागिरी केबीबीएफच्या अध्यक्षपदी सुहास ठाकूरदेसाई यांची फेरनिवड

रत्नागिरी : के. बी. बी. एफ. या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावयासिक संघटनेच्या रत्नागिरी चॅप्टरच्या अध्यक्षपदी हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई यांची या वर्षासाठी फेरनिवड झाली आहे.

कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन ही संघटना उद्योजकांना जोडणारा, वाढ घडवणारा आणि संधी निर्माण करणारा एक मजबूत परिवार आहे. पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रेरणेतून आणि नेतृत्वाखाली गेल्या १३ वर्षांत केबीबीएफने राज्यभर आपला ठसा उमटवला आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि बडोदा अशा शाखांमधून अडीचशेहून अधिक उद्योजक या परिवाराचा भाग झाले आहेत.

ज्ञातीपलीकडील नाती जपणारा दृष्टिकोन, दर ६ महिन्यांनी होणारी ग्लोबल मीट, तज्ज्ञांकडून व्यवसाय मार्गदर्शन, यशस्वी उद्योजकांचे अनुभव, नवीन बिझनेस कनेक्शन्स आणि संधी, स्वतःच्या व्यवसायाच्या वाढीसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म ही या संघटनेची वैशिष्ट्ये आहेत.

संघटनेच्या रत्नागिरी चॅप्टरच्या बैठकीत नव्या आर्थिक वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सुहास ठाकूरदेसाई यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली असून प्रशांत आचार्य यांची ट्रेझरर आणि सौ. मुग्धा करंबेळकर यांची सेक्रेटरी म्हणून निवड झाली आहे.

नव्या आर्थिक वर्षासाठी सभासद नोंदणी सुरू झाली असून वार्षिक सभासद शुल्क ३,५०० रुपये आहे. ज्या कऱ्हाडे ब्राह्मण उद्योजक किंवा उद्योजिकेला आपल्या व्यवसायाला नवीन दिशा, नवीन ओळखी आणि मोठ्या संधी द्यायच्या असतील, त्यांनी केबीबीएफ परिवारात सहभागी व्हाने. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी सुहास ठाकूरदेसाई (9822290859), प्रशांत आचार्य (9420907533) किंवा सौ. मुग्धा करंबेळकर (8237753036) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply