संगमेश्वरहून उमरे येथे जाणाऱ्या एसटी बसवर विद्युतवाहिनी तुटून
पडल्याची घटना आज, बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने मोठी
जीवितहानी टळली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
संगमेश्वरहून उमरे येथे जाणाऱ्या एसटी बसवर विद्युतवाहिनी तुटून
पडल्याची घटना आज, बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने मोठी
जीवितहानी टळली.
कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा, कथा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
माजी सैनिक अनंत नरहर गोखले यांचे अल्पशा आजाराने २० ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. मूळचे कर्ला-लिमयेवाडी येथील रहिवासी असलेले गोखले ७८ वर्षांचे होते. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अनंत गोखले पार्थिवाचे देहदान करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्पनेतून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेल्या सेवा अभियानांतर्गत रत्नागिरीत आज सुमारे १२५ निवेदनं स्वीकारण्यात आली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या सुशिक्षित, पात्र तरुणांना इथेच रोजगार मिळावा, यासाठी क्लास वन आणि क्लास टू अधिकारी वगळता शिक्षक आणि अन्य सर्व पदांवरची भरती जिल्हा संवर्गातून होण्याची आवश्यकता आहे. यापैकी ८० टक्के पदांवर स्थानिक भरती होणं गरजेचं असून, या मागणीशी संबंधित विधेयक आगामी अधिवेशनात मांडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली. आज संध्याकाळी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त रत्नागिरीतल्या शिवमंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.