मुंबई विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरीत सुरू

मुंबई विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरीत सुरू

मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचं आज (२५
ऑक्टोबर) रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात उद्घाटन झालं. ५१
महाविद्यालयांमधल्या १०० महिला आणि १०० पुरुष अशा २०० स्पर्धकांनी या स्पर्धेत
सहभाग घेतला असून, त्या चार दिवस चालणार आहेत.

शाळकरी मुलांनी मनसोक्त जगावे, खेळावे, वाचावे; मोबाइल वापरावा दिवसातून फक्त पाच मिनिटे!

आगाशे विद्यामंदिरात डॉ. अक्षय फाटक यांचा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद; मोबाइलचा अतिवापर आणि आर्थिक फसवणुकीबाबत मार्गदर्शन

शारदामातेसमोर पाना-फुलांचे आकर्षक सुशोभन; आगाशे विद्यामंदिरात झाली पालकांसाठी स्पर्धा

भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त पालकांसाठी पाना-फुलांच्या सुशोभनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : येथील चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात श्रीरंग जोगळेकरला सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील श्रीरंग जोगळेकर याने संवादिनी (हार्मोनियम) वादन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात शास्त्रीय गायनात तन्वी मोरेला रौप्यपदक

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले.