मराठी भाषेच्या व्रतस्थ उपासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

व्याकरण, प्रमाणलेखन आणि भाषाशास्त्रासाठी आयुष्य वेचलेल्या ‘भाषायोगिनी’ने वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील लोककला-लोकसंस्कृती या विषयावर कथा, लेख आणि रील स्पर्धा

कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा, कथा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जिवंतपणी देशसेवा आणि मृत्युपश्चात देहदान; रत्नागिरीतील माजी सैनिक अनंत गोखले यांचे निधन

माजी सैनिक अनंत नरहर गोखले यांचे अल्पशा आजाराने २० ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. मूळचे कर्ला-लिमयेवाडी येथील रहिवासी असलेले गोखले ७८ वर्षांचे होते. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अनंत गोखले पार्थिवाचे देहदान करण्यात आले.

समस्या प्रलंबित आहे? सेवा अभियानाचा लाभ घ्या! भाजपचे आवाहन; रत्नागिरीत १२५ निवेदने सादर

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्पनेतून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेल्या सेवा अभियानांतर्गत रत्नागिरीत आज सुमारे १२५ निवेदनं स्वीकारण्यात आली.

शिक्षकांसह सरकारी भरतीत ८०% पदे कोकणातील उमेदवारांसाठी राखीव असावीत; आमदार प्रमोद जठार यांचे प्रयत्न

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या सुशिक्षित, पात्र तरुणांना इथेच रोजगार मिळावा, यासाठी क्लास वन आणि क्लास टू अधिकारी वगळता शिक्षक आणि अन्य सर्व पदांवरची भरती जिल्हा संवर्गातून होण्याची आवश्यकता आहे. यापैकी ८० टक्के पदांवर स्थानिक भरती होणं गरजेचं असून, या मागणीशी संबंधित विधेयक आगामी अधिवेशनात मांडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली. आज संध्याकाळी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे पंधरावा श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे हे सलग पंधरावे वर्ष आहे.