रोटरी क्लब बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे विजेता, साहस नारकरला उपविजेतेपद

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता ठरला, तर चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद मिळाले.

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या वरद पेठेने
संपूर्ण स्पर्धेत ८ फेऱ्यांमध्ये अपराजित राहत ७.५ गुणांसह निर्विवाद प्रथम क्रमांक पटकावला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम फेरीतील सामन्यात साहस नारकरने रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाई विरुद्ध विजय संपादन केला, तर यश गोगटे याने प्रवीण सावर्डेकर विरुद्धचा डाव जिंकला. साहस व यश दोघांचेही प्रत्येकी ७ गुण झाले पण सरस टाय ब्रेक गुणांवर साहसने उपविजेतेपद प्राप्त केले व यशला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेतील इतर विजेते असे :
खुला गट क्रमांक चार ते दहा : अनंत गोखले, सोहम रुमडे, सौरीश कशेळकर, आयुष रायकर, प्रवीण सावर्डेकर, साईप्रसाद साळवी , लवेश पावसकर.

विविध वयोगटातील उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त खेळाडू :

१५ वर्षांखालील वयोगट :
ओम उत्तेकर, श्लोक घाग, आर्या पळसुलेदेसाई

१३ वर्षांखालील वयोगट :
अथर्व साठे, अंकुश कौरवार, अद्वैत शानभाग

११ वर्षांखालील मुले :
अर्णव गावखडकर, रुद्र जोशी, विराज बनसोड

९ वर्षांखालील वयोगट :
आरव निमकर, पार्थ बेल्हेकर, रूपक चाचले
७ वर्षांखालील वयोगट :
श्रेष्ठ दीक्षित, चैतन्य धुपकर, आस्तिक कुलकर्णी

वरिष्ठ वयोगट : विवेक जोशी, गिरीश भिडे, नरेंद्र चोगले

महिला : सई प्रभुदेसाई, सानवी दामले, मृण्मयी दांडेकर

दिव्यांग खेळाडू : मोहसीन सय्यद, कुणाल मयेकर

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला एकूण २५ फिडे मानांकित खेळाडूंसह संपूर्ण जिल्ह्यातून १७० पेक्षा अधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग लाभला. स्पर्धेचे बक्षीस वितरण रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे प्रेसिडेंट डॉ. संदीप करे यांचे उपस्थितीत झाले. यावेळी सीताराम सावंत – सचिव, विनायक निकम , अस्मिता चोप्रा, प्रवीण लाड, स्वप्ना करे, वामन सावंत, प्रदीप साळुंखे, स्पर्धा समन्वयक अमर आयरे, स्पर्धा प्रमुख जयेश दिवाणी, शर्वरी लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

लांजा येथील फिडे आर्बिटर सौ. प्राची मयेकर-सुर्वे यांनी स्पर्धेत प्रमुख पंचाची कामगिरी पार पडली. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी यांनी स्पर्धेचे नियोजन केले. उपेंद्र खेर, अद्वैत काळे, चैतन्य भिडे यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply