प्लास्टिकचा वापर थांबवायला हवा, यात कोणतीच शंका नाही. मात्र अचानक हा वापर थांबविता येणार नाही. त्याला कोणता तरी तितकाच समर्थ पर्याय दिला गेला पाहिजे. हा पर्याय उपलब्ध करणे मोठे आव्हानाचे आहे. हेच आव्हान स्वीकारले गेले पाहिजे. त्याबाबत अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. पर्यावरणस्नेही प्लास्टिकची निर्मितीही केली जात आहे. मात्र प्रदूषणकारी प्लास्टिकएवढे ते किफायतशीर नाही. सहज परवडणारे नाही. म्हणूनच त्यावर संशोधन आणि त्यातून निर्मिती झाली पाहिजे.
