लांजा-राजापूरमध्ये रविवारपासून साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण

लांजा : विश्व मराठी परिषद आयोजित साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमेअंतर्गत पुण्याहून ६० तरुण १६ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत लांजा-राजापूर परिसराचा दौरा करणार आहेत.

साखरपा ते धूतपापेश्वर या मार्गावर होणाऱ्या या पदभ्रमण परिक्रमेच्या माध्यमातून कोकणातील इतिहास, संस्कृती, पर्यटन, पर्यावरण आणि ग्रामीण जीवनशैलीचा अभ्यास करण्यात येणार आहे.

या परिक्रमेअंतर्गत माचाळ, प्रभानवल्ली, भांबेड, वाटूळ आणि राजापूरमधील धोपेश्वर येथे सहभागींचा मुक्काम असणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसरातील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांना भेटी, कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांवर व्याख्याने तसेच स्थानिक कला-संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्यात येणार आहेत.

या सहा दिवसीय उपक्रमादरम्यान सहभागींच्या निवास व भोजनाची व्यवस्था स्थानिकांच्या सहकार्याने करण्यात येणार असून विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यासाठी पुढाकार घेत आहेत.

लांजा-राजापूरच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या संख्येने तरुण कोकणचा समृद्ध वारसा, पर्यावरण, लोकसंस्कृती आणि पर्यटनाचा अभ्यास करण्यासाठी येत असल्याने या उपक्रमाबद्दल परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply