सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटे चार वाजल्यापासून तौते चक्रीवादळ

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात रविवारी, १६ मे रोजी दाखल होत आहे. पहाटे ४ वाजता ते जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार असून दुपारी २ वाजल्यानंतर ते जिल्ह्यातून पुढे जाईल. या काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

Continue reading

तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तोक्ती चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

करोना विलगीकरणातील आणि बरे झालेल्यांसाठी अभाविपची हेल्पलाइन

रत्नागिरी : जिज्ञासा आणि अभाविप रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तींसाठी, तसेच करोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी मानसिकदृष्ट्या आधारासाठी आरोग्यमित्र हेल्पलाइन सुरू केली आहे.

Continue reading

कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी सदाशिव टेटविलकर

ठाणे : कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची निवड झाली आहे.

Continue reading

करोनाबाधितांचे मरण सुसह्य करण्यासाठी पाठविले सरण

रत्नागिरी : वाघ्रट (ता. लांजा) गावचे सुपुत्र, उद्योजक ऋषीनाथ तथा दादा पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आज रत्नागिरी पालिकेच्या स्मशानभूमीसाठी २५ टन इतके लाकूड मोफत देण्यात आले. करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची अंत्यसंस्कारावेळी परवड होऊ नये या सामाजिक जाणिवेतून ही लाकडे देण्यात आली.

Continue reading

सावधान! ती मतदान केल्याची नव्हे, होम आयसोलेशनमध्ये ठेवल्याची खूण!

रत्नागिरी : आपल्या आजूबाजूला कोणाच्या डाव्या किंवा उजव्या हाताच्या बोटावर शाई दिसली, तर सावधान! ती निवडणुकीचे मतदान करून आलेली व्यक्ती नव्हे, तर त्या व्यक्तीला करोना प्रतिबंधासाठी होम आयसोलेशन किंवा होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे ते निदर्शक आहे.

Continue reading

1 2 3 31