बालसाहित्यिक मदन हजेरी यांना गोवंडे पुरस्कार प्रदान

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कै. श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री. हजेरी बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३२ वर्षे ग्रंथालय कार्यवाह म्हणूनही काम पाहिले आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक कै. गोवंडे महाराष्ट्र शासनाच्या महाकवी कालिदास पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्त्व होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. श्रीकांत गोवंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना हजेरी यांनी बालसाहित्य चळवळीचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक प्रशांत पाटेकर, लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते. अनिल लोंढे यांनी हजेरी यांचा परिचय करून दिला.

यावेळी वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, मसाप-चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, ‘आपलं चिपळूण’ संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रवींद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले. आभार धीरज वाटेकर यांनी मानले.सह वाचनालयाच्या प्राची जोशी, मंजूषा चितळे, अमित ओक, गणेश सोनवणे, ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply