जांभूळआड (पूर्णगड) येथील प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांच्या ‘मातीचा जातीचा शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी पावसमध्ये झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जांभूळआड (पूर्णगड) येथील प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांच्या ‘मातीचा जातीचा शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी पावसमध्ये झाले.
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता ठरला, तर चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद मिळाले.
दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार असून, रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
देवरूख : धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करत असताना इतिहास ग्रंथांमध्ये नोंद असलेले १६६६ मधील ‘Battle of Devrukh’ हे देवरूखच्या शिवकालीन इतिहासाविषयीचे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक प्रकरण संशोधकांच्या लक्षात आले आहे.
मालवण : माझी मालवणी कविता मालवणी मातीतच रुजून आली. म्हणूनच तिच्यात मालवणी माणसांची सुखदुःखे, त्यांचा इरसालपणा दिसून येतो. दारिद्र्यातही विचारांची श्रीमंती देणारी माझी आई माझ्या प्रत्येक कवितेची मूलस्रोत आहे, असे उद्गार मालवणी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांनी काढले.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.