विलास रहाटे यांची ‘नाबार्ड’ कार्यालयातील रांगोळी लक्षवेधी

देवरूख : देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे खुली लेखन स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सलग नवव्या वर्षी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या दादागिरीवर कारवाईची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअरिंग रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.

सरकार आणणार नवा लँड टायटलिंग कायदा : महसूलमंत्री बावनकुळे यांची रत्नागिरीत घोषणा

जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ हे त्याचं तत्त्व असेल. तसंच, कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही लवकरच आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली.

रोटरी क्लब बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे विजेता, साहस नारकरला उपविजेतेपद

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता ठरला, तर चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद मिळाले.

देवरूखचा शिवकालीन इतिहास उलगडणारा नवा संदर्भ

देवरूख : धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करत असताना इतिहास ग्रंथांमध्ये नोंद असलेले १६६६ मधील ‘Battle of Devrukh’ हे देवरूखच्या शिवकालीन इतिहासाविषयीचे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक प्रकरण संशोधकांच्या लक्षात आले आहे.