देवरूख : देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.
दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. कोलकाता येथील टाऊन हॉलमध्ये ७ ऑगस्ट १९०५ रोजी ब्रिटिश सरकारच्या विरोधात अधिकृतपणे स्वदेशी चळवळीचा प्रारंभ झाला होता. याच घटनेची आठवण म्हणून भारत सरकारने ७ ऑगस्ट २०१५ रोजी पहिला राष्ट्रीय हातमाग दिन घोषित केला. पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे झाले. देशातील हातमाग विणकर समुदायाचा सन्मान करणे व त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या दिनामागे आहे. हातमाग विणकरांचे सबलीकरण आणि माय हॅन्डलूम… माय प्राइड ही यावर्षीच्या राष्ट्रीय हातमाग दिनाची संकल्पना आहे.

या दिनानिमित्ताने नाबार्डच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयात श्री. रहाटे यांनी साकारलेली रांगोळी रसिक प्रेक्षकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. श्री. रहाटे यांनी नाबार्डसाठी यावेळी तिसऱ्या वेळी रांगोळी साकारली आहे. यापूर्वी दोन वेळा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सलग दोन वर्षे रांगोळ्या साकारल्या होत्या. यावर्षीच्या रांगोळीमध्ये श्री. रहाटे यांनी पारंपरिक हातमागावर वस्त्रे विणणारी स्त्री, जिने हातमागावर तयार झालेली आकर्षक नक्षीकाम असणारी साडी परिधान केली आहे, राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हातमाग प्रदर्शनासाठी येणारे मान्यवर, कलाकार व हातमाग प्रेमी नागरिकांकडून श्री. रहाटे यांच्या आकर्षक रांगोळीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media