Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए मुकुंद मराठे

Advertisements

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी सीए मुकुंद मराठे यांची निवड झाली. ही कार्यकारिणी २०२३-२४ या एक वर्षासाठी काम पाहणार आहे.

वर्षभरात इन्स्टिट्यूटतर्फे महिला दिन कार्यक्रम, सीएंकरिता व्याख्याने, विद्यार्थ्यांकरिता उपक्रम, व्यावसायिकांसाठी माहितीसत्र आणि विविध चर्चासत्र, मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सीए मराठे यांनी यावेळी जाहीर केले.

शाखेच्या उपाध्यक्षपदी सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर आणि सदस्य म्हणून सीए प्रसाद आचरेकर यांची निवड करण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सीएंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सीए अभिलाषा मुळ्ये यांनी सांगितले.

इन्स्टिट्यूटच्या मारुती मंदिर, जोगळेकर कॉलनी येथील कार्यालयामध्ये नव्या कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, सीए बिपीन शाह आणि सीए आनंद पंडित यांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत केले.

सीए इन्स्टिट्यूटची नवी कार्यकारिणी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version