सीए इन्स्टिट्यूटतर्फे आविष्कार संस्थेत शैक्षणिक साहित्य वितरण

रत्नागिरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेतर्फे आविष्कार संस्थेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा कार्यक्रम करण्यात आला. आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, अशा वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, विकासा चेअरमन सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर, आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शाह आणि आविष्कार कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर उपस्थित होते. रत्नागिरी शाखेतर्फे आविष्कार या संस्थेला प्रथमोपचार पेटी, घड्याळे, कात्री, चित्र काढण्यासाठी कागद, ब्रश जिलेटिन पेपर, पेपर कटर, स्केचपेन्स आदी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.

अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रत्नागिरी शाखा नेहमीच सामाजिक भान ठेवून काम करत असते आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असते.

आविष्कार करत असलेल्या कार्यासंबंधी कौतुक व कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आविष्कार संस्थेचे आभार मानले. आविष्कार संस्थेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. त्यांनी रत्नागिरी शाखेचे विशेष आभार मानले. याप्रसंगी शामराव भिडे कार्यशाळेतील निदेशक, सीए इन्स्टिट्यूट शाखेतील लिपिक सोनल आंब्रे आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply