Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात ११० शक्तिकेंद्रांवर मन की बातचे सामूहिक श्रवण

Advertisements

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या आकाशवाणीवरच्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपाच्या ११० शक्तिकेंद्रांवर सामूहिक श्रवण करण्यात आले, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

श्री. पटवर्धन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांबरोबर संवाद साधणारा सलग शंभरावा मन की बात कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून सादर केला. लोकशाही राष्ट्रात सलग १०० वेळा संवाद साधण्याचा उपक्रम पंतप्रधानांनी करणे ही ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधानांच्या मनात जनतेविषयी असलेली आपुलकी दाखविणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधत आज भाजपाने देशभर सामूहिक पद्धतीने शक्तिकेंद्रे, बूथ केंद्रावर मन की बात कार्यक्रमाच्या सामूहिक श्रवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात ५ मंडलात ७६ शक्तिकेंद्रांत मिळून ११० ठिकाणी ३००० कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ऐकण्याचा आनंद घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे बूथ सशक्तीकरण कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा होता. त्यानुसार १६३ पैकी ७६ शक्तिकेंद्रात हा कार्यक्रम झाला.

भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ समिती सदस्य, स्थानिक नागरिक यांचा सहभाग लक्षणीय होता. त्यानिमित्ताने भाजपाने आपली संघटनात्मक ताकद अजमावली, असे म्हणता येईल, असेही श्री. पटवर्धन म्हणाले.

दरम्यान, अशा कार्यक्रमांमुळे बूथ सशक्तिकरण उपक्रम अधिक जोमाने पुढे जायला मदत होणार असून आजअखेर सरल अॅपच्या माध्यमातून ६०५ कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर प्रभावी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज रत्नागिरी शहर मंडल, धामणसे, निवळी, रीळ ग्रामपंचयायती, करबुडे, गावखडी येथील कार्यक्रम लक्षणीय ठरल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.

मन की बात थेट ऐकण्यासाठी

https://www.narendramodi.in/mar/mann-ki-baat

पंतप्रधानांच्या हिंदी संवादाचा मराठी अनुवाद सोबतच्या लिंकवर –

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1920867

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version