Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे सप्टेंबरमध्ये श्रावण महोत्सव

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे येत्या १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत श्रावण महोत्सवानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

महिला बचत गटातील महिला आणि इतर उदयोन्मुख उद्योजिका महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी मिळावी आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ग्राहकांना विविध आकर्षक वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते रात्री साडेआठ या वेळेत खुले राहणार आहे.

प्रदर्शन कालावधीत विविध पारंपरिक खेळ, फुगड्या यांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध स्पर्धा लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे घेण्यात येणार आहेत. स्टॉल बुकिंगसाठी प्राची शिंदे (९४२२३७६२२४ किंवा ९७६४४१७०७९) यांच्याशी त्वरित संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन रत्नागिरी जिल्हा परिषद भवनजवळील मराठा भवन मंगल कार्यालयात होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version