रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे जे. के. फाइल्स येथील साई मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्ष अॅड. शाल्मली आंबुलकर यांनी बेगमीच्या वस्तू, पदार्थांच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्या म्हणाल्या की, ग्राहक नेहमीच राजा असतो. त्यामुळे त्यांच्या सूचना, टिप्स ऐकून आपण सुधारणा केली पाहिजे. आपला ब्रॅंड करण्यासाठी या सूचना महत्त्वाच्या असतात. रत्नागिरी ग्राहक पेठेच्या माध्यमातून प्राचीताई शिंदे यांनी रत्नागितील उद्योगिनींना चांगली संधी मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे नवनवीन उद्योजिका तयार होत आहेत.

यावेळी रत्नागिरी ग्राहक पेठच्या संचालिका प्राची शिंदे यांनी सांगितले, २००५ पासून मी महिला बचत गट, उद्योगिनींची वस्तू विक्री प्रदर्शने आयोजित करत आहे. महिला उद्योगिनी किंवा व्यावसायिक पैसे मिळवतात, पण या प्रदर्शनांतून महिलांना मैत्रिणी मिळतात, माणसे जोडली जातात. रत्नागिरी ग्राहक पेठ हे एक मोठे कुटुंब बनले आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आता स्वतःची दुकाने साकारली आहेत.

व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरी जिल्हा महिला पतंसस्थेच्या सेक्रेटरी सौ. कृतिका सुवरे तसेच संयोजिका शकुंतला झोरे उपस्थित होत्या. यावेळी उद्योगिनी प्रतीक्षा सरगर, संध्या नाईक, राधा भट, स्वाती सोनार, कीर्ती मोडक, शुभांगी इंदुलकर आदी उपस्थित होत्या. महिला पतसंस्थेच्या स्थापनेपासून सेक्रेटरीपद अतिशय कार्यक्षम पद्धतीने सांभाळणाऱ्या सौ. कृतिका सुवरे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना ग्राहक पेठेतर्फे सन्मानित करण्यात आले. पत्रकार अनघा निकम आणि पत्रकार, छायाचित्रकार मकरंद पटवर्धन यांचा सत्कार अॅड. आंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रदर्शनात महिला बचत गट आणि उद्योगिनींनी आंबे, बेगमीचे पदार्थ, विविध मसाले, पीठे, कोकण मेवा, महिलांसाठीची विविध उत्पादने, पर्सेस, सौंदर्य प्रसाधने, साड्या, ड्रेस मटेरियल, गारमेंट्स आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले आहेत.

हे प्रदर्शन ५ मेपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात आज पारंपरिक वेशभूषा स्पर्धा झाली. २ मे रोजी फनी गेम्स, ३ मे रोजी प्रॉपर्टी खरेदी करताना घ्यावयाची दक्षता यावर शबाना वस्ता यांचे मार्गदर्शन, ४ मे रोजी टाकाऊतून टिकाऊ वस्तू प्रशिक्षण (सौ. प्रांजल घोसाळे) आणि अखेरच्या दिवशी ५ मे रोजी रवींद्रनगर, कुवारबाव येथील श्री माऊली महिला भजन मंडळाचे भजन आयोजित केले आहे. रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालिका प्राची शिंदे यांनी केले आहे.

कृतिका सुवरे यांचा सत्कार करताना प्राची शिंदे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply