ओणी येथे २५ नोव्हेंबरपासून डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमाला

ओणी येथे २५ नोव्हेंबरपासून डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमाला

राजापूर : ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राजापूर शाखेतर्फे येत्या २५ ते २८ नोव्हेंबर या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

व्याख्यानमालेतील पहिले विचार पुष्प बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते दु. १२.३० या वेळेत होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीसाठीचे कार्य या विषयावर कणकवलीच्या कवयित्री प्रमिता तांबे आपले विचार मांडली.

दुसऱ्या दिवशी, गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते दु. १२.३० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना या विषयावर कणकवलीचे सुप्रसिद्ध कवी अजय कांडर विचार मांडणार आहेत. तिसरे विचार पुष्प शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते दु. १२.३० या वेळेत मराठी कवितेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन या विषयावर रत्नागिरीचे प्रा. डॉ. शिवराज गोपाळे गुंफतील. अखेरच्या दिवशी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत चिपळूणचे कवी राष्ट्रपाल सावंत संविधानाचे महत्त्व या विषयावर बोलतील.

या व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सचिव अॅड. गुरुदत्त शहाजी खानविलकर, कार्याध्यक्ष प्रदीप धोंडू संसारे, कोमसापचे कार्यवाह विनोद गंगाराम मिरगुले, शाळा समिती अध्यक्ष सूर्यकांत सुतार आणि शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. साक्षी संतोष शिंदे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply