मुंबई :चालू २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची झालेली मोठी तूट आणि
प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५
तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा
आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांचा
समावेश आहे.