रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी मुदतीच्या अखेरच्या आपला उमेदवारी अर्ज सादर केला. नागरिकांच्या आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि सहकार्याच्या बळावर आपण उमेदवार म्हणून उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना मिलिंद साळवी यांनी उपस्थित सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. या वेळी त्यांनी प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. ‘प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे, मूलभूत सुविधा पुरवणे आणि विकासाला गती देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल. मला विश्वास आहे, की जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहतील,’ असे ते म्हणाले. या वेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साळवी यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एकमधील निवडणूक आता अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

