रत्नागिरीतील निवृत्त पोलीस अधिकारी विजयकुमार आगाशे यांचे देहदान

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलातून सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) म्हणून निवृत्त झालेले विजयकुमार वासुदेव आगाशे (रा. बंदररोड, रत्नागिरी) यांचे आज (१८ नोव्हेंबर २०२५) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. आगाशे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेले हे तेरावे देहदान आहे.
विजयकुमार आगाशे यांनी १९६२ ते १९९३ या कालावधीत रत्नागिरी पोलीस दलात सेवा बजावली. एएसआय म्हणून ते सेवानिवृत्त झाले. आगाशे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आगाशे यांचे मरणोत्तर देहदान करताना प्रदीप आगाशे आणि सचिन आगाशे हे त्यांचे दोन्ही मुलगे उपस्थित होते. देहदानाच्या संपूर्ण प्रकियेमध्ये रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर यांनी काम पाहिले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply