रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक महायुती एकत्र येऊन लढवत असून, ३२ जागांपैकी भारतीय जनता पक्ष सहा जागांवर, तर उर्वरित सर्व जागांवर शिवसेना निवडणूक लढवत आहे. शिवसेनेने शिल्पा प्रशांत सुर्वे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असून, आज शक्तिप्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. नगराध्यक्षपदासह सर्व ३२ जागांवर महायुती विजयी होईल, असा विश्वास शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या वेळी व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवानी मिहिर माने यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असून, त्यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी, बसप, मनसे या पक्षांनीही पाठिंबा दिला आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विधान परिषदेच्या माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. चिपळूण नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार रमेश कदम यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज भरला. गुहागर नगर पंचायतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज भरण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सात अध्यक्षपदांसाठी ५६, तर १५१ नगरसेवक पदांसाठी ६३५ जणांनी भरले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायती अशा सात संस्थांच्या अध्यक्षपदांसाठी एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसंच, एकूण १५१ नगरसेवक पदांसाठी ६३५ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (१७ नोव्हेंबर) अंतिम मुदत होती. ती संपल्यानंतरची आकडेवारी नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त वैभव गारवे यांनी जाहीर केली आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या अगदीच किरकोळ होती. महत्त्वाच्या पक्षांनी तोपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते; मात्र १४ ते १७ नोव्हेंबर या अखेरच्या चार दिवसांत राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला वेग आला आणि मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज सादर केले. जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी सात, चिपळूणच्या अध्यक्षपदासाठी १३, खेडसाठी आठ, तर राजापूर नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुहागर आणि लांजा या नगर पंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी प्रत्येकी सात, तर देवरूख नगर पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. नगरसेवक पदासाठी रत्नागिरीत ३२ जागांसाठी १३२, चिपळुणात २८ जागांसाठी १४१, खेडमध्ये २० जागांसाठी ८२, तर राजापूरमध्ये २० जागांसाठी ६५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. गुहागर, देवरूख आणि लांजा या नगर पंचायतींमधल्या प्रत्येकी १७ जागांसाठी ५६, ७९ आणि ८० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media