स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून ११ संचालक बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.

राज्य कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याने अॅड. दीपक पटवर्धन, माधव गोगटे, जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, प्रदीप कुलकर्णी, अजित रानडे, शरद्चंद्र लेले, राजेंद्र सावंत, मधुरा गोगटे, मानसी बापट आणि संतोष प्रभू हे ११ संचालक निवडून आले आहेत.

संचालक मंडळात संतोष प्रभू हे नवे संचालक समाविष्ट करण्यात आले असून कै. अरविंद कोळवणकर यांच्या जागी त्यांची निवड झाली आहे.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या बलवान आहे. विक्रमी वसुलीसह सातत्यपूर्ण, वर्धिष्णु अर्थकारण करणारी पतसंस्था ही बिरुदावली दिमाखात मिरवता येईल, अशी पतसंस्थेची गेल्या आर्थिक वर्षाची प्रगती आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या आर्थिक वर्षात विक्रमी वसुलीचा पायंडा कर्जदारांच्या सहकार्याने कायम राखत ९९.६१ टक्के वसुली झाली आहे. संस्थेच्या १० शाखांची वसुली १०० टक्के झाली असून एकूण २२ हजार ५५६ कर्जदारांपैकी केवळ ४० कर्जदार थकीत राहिले आहेत. संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के ठेवण्यात संस्थेला यश मिळाले. यावर्षी झालेल्या उत्तम वसुलीमुळे संशियत कर्जापोटी नव्याने तरतूद करावी लागली नाही. आर्थिक वर्षात संस्थेचे येणे कर्ज १८२ कोटी रुपये असून गतवर्षीपेक्षा १२ कोटींची वाढ एकूण कर्ज व्यवहारात झाली. ठेवींमध्येही १५ कोटींची वाढ झाली असून वर्षअखेरीला २६५ कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे ७६ हजार ५२७ ठेवीखात्यांचे माध्यमातून जमा आहेत. गुंतवणूक १३१ कोटी रुपयांची असून संस्थेचा स्वनिधी ३७ कोटी इतका झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ६ कोटी ६१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून गतवर्षीपेक्षा यावर्षी ४० लाखांनी नफा वाढला आहे.

सन २०२१-२२ च्या पूर्वार्धात बँक ठेव व्याजदर कमी झाल्याने १ कोटी ५० लाखांचे उत्पन्न कमी झाले, तरीही सुरुवातीपासून योग्य नियोजन करत ठेवी उभारणी दर आणि कर्ज व्याजदर यात प्रमाणबद्ध बदल करत सोनेतारण कर्जाचे प्रमाण वाढवत वर्षअखेरीला ६ कोटी ६१ लाख निव्वळ नफा मिळविण्यात संस्थेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

या वर्षअखेर पतसंस्थेची सभासद संख्या ४२ हजार २५० झाली असून संस्थेच्या १७ शाखांच्या माध्यमातून हा अर्थव्यवहार होत आहे. सर्व शाखांनी उत्तम नफा आणि व्यवसाय वृद्धी केली आहे. नवीन आर्थिक वर्षात ५ नव्या शाखा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ३०० कोटींचा ठेवटप्पा पार करताना २०० कोटींचा कर्जटप्पा पार करत संस्थेचा संमिश्र व्यवसाय ५०० कोटी पार करण्यासाठी नव्या आर्थिक वर्षात प्रयत्न केले जातील. कर्जमर्यादेत वाढ करणए, क्यूआर कोड सुविधेसह अन्य डिजिटल बँकिंग सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करणे असे प्रयत्न आहेत. पावस आणि चिपळूण येथे संस्थेच्या स्वमालकीचे कार्यालयाचे स्वप्न या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पूर्ण होईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply