स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा नववर्ष ठेववृद्धी मास १ जानेवारीपासून

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ १ जानेवारीपासून सुरू होत असून २०२६ सालचे स्वागत करतानाच स्वरूपानंद ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याच्या समीप आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.

कोकणातील सहकार चळवळ मजबूत करणार : प्रवीण दरेकर

‘कोकणात सहकारी चळवळ जास्त ताकदीने वाढू शकते, असा विश्वास मला वाटतो. कारण काही अपवाद वगळता कोकणातील सहकारी संस्थांचे व्यवहार चांगले चालले आहेत; मात्र कोकणातील सर्व सहकारी संस्थांना संघटित करून नीट ताकद आणि दिशा देण्याची आवश्यकता आहे. राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून माझा तो प्रामाणिक प्रयत्न असेल,’ असं प्रतिपादन स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, तसंच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज (६ ऑक्टोबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केलं.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्श : प्रवीण दरेकर

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २२ जुलै २०२५ रोजी एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या मासिकाची संकल्पना नावीन्यपूर्ण : रवींद्र चव्हाण यांचे प्रकाशनानंतर कौतुकोद्गार

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे आज (१९ जून) भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ठेववृद्धी मासातून देणार भारतीय सैन्याला निधी

दर वर्षीप्रमाणे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास येत्या २० जूनपासून सुरू होत आहे. यंदाचा ठेववृद्धी मास राष्ट्रप्रेमाला समर्पित असेल, अशी घोषणा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. जेवढे ठेवीदार संस्थेमध्ये ठेव गुंतवतील, त्या प्रत्येक ठेवीदारामागे संस्थेच्या वतीने २५० रुपये भारतीय सैन्याला निधी म्हणून प्रदान केले जाणार आहेत.