मुख्यमंत्री सहाय्यता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख

रत्नागिरी : आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २२ जुलै २०२५ रोजी एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. याद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस होता. या दिवशी अनेक जण शुभेच्छापर जाहिरात देतात. बॅनर लावतात. मात्र हा खर्च करण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, यातून राज्याच्या जनतेला मदत करता येते, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाख रुपयांचा धनादेश देण्याचे सर्वांच्या सहमतीने ठरवले. त्यानुसार आज धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट आणि उपव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते. या निधीबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची देदीप्यमान वाटचाल आणि सामाजिक दायित्व याबद्दल श्री. सिंह यांनी आनंद व्यक्त केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply