स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या मासिकाची संकल्पना नावीन्यपूर्ण : रवींद्र चव्हाण यांचे प्रकाशनानंतर कौतुकोद्गार

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे आज (१९ जून) भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या मासिकाच्या ई-बुकचेही या वेळी प्रकाशन झाले. एखाद्या सहकारी पतसंस्थेने सभासदांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मासिक सुरू करण्याची संकल्पना नावीन्यपूर्ण असल्याचे सांगून, चव्हाण यांनी कौतुक केले. त्यांनी अ‍ॅड. पटवर्धन यांच्याकडून मासिकाविषयी आणि पतसंस्थेच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती घेतली आणि शुभेच्छा दिल्या. ‘स्वरूप सहकार म्हणजे जनसंचयातून धनसंचय करणाऱ्या विश्वासार्ह संस्थेचे मुखपत्र असून, संस्थेच्या निर्णयांसह अनेक महत्त्वाच्या बाबी सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मासिक सुरू करण्यात आले आहे,’ अशा शब्दांत पतसंस्थेचे अध्यक्ष आणि ‘स्वरूप सहकार’चे संपादक अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी यामागची आपली भूमिका मांडली.

या वेळी स्वरूपानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक प्रसाद जोशी, व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, ‘स्वरूप सहकार’चे कार्यकारी संपादक अनिकेत कोनकर, रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक अनिकेत पटवर्धन, ‘कोकण मीडिया’चे संपादक प्रमोद कोनकर आदींसह पतसंस्थेचे ठेवीदार, सभासद उपस्थित होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

दर वर्षीप्रमाणेच यंदाही २० जून ते २० जुलै या कालावधीत पतसंस्थेचा ठेववृद्धी मास होणार असून, त्याचे औचित्य साधून आज मासिकाचे प्रकाशन करण्यात आल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आर्थिक शिस्त सातत्याने पाळून स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने विश्वासार्ह प्रतिमा तयार केली आहे. ३४ वर्षांच्या प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठताना नवीन टप्प्याचा वेध घेत स्वरूपानंद पतसंस्थेने आपले अर्थविश्व विस्तारले. आर्थिक संस्थेला अपेक्षित असलेली प्रमाणबद्धताही संस्थेने सातत्याने राखली. केवळ १० हजारांच्या भांडवलावर सुरू झालेले हे अर्थचक्र आज ६०० कोटींच्या संमिश्र व्यवसायापर्यंत पोहोचले आहे. पतसंस्थेचा हा प्रवास ग्राहक सभासदांपर्यंत योग्य पद्धतीने मांडण्याची गरज जाणवू लागली. म्हणून ‘स्वरूप सहकार’ हे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. संस्थेची उद्दिष्टे, उपक्रम, महत्त्वाचे निर्णय, आर्थिक गोषवारा, आर्थिक स्थितीबद्दल सहकारतज्ज्ञांची मते, शासनाची परिपत्रके या बाबी ग्राहक सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुवा म्हणून ‘स्वरूप सहकार’ हे मासिक काम करील. तसेच, एखाद्या आर्थिक संस्थेची आर्थिक स्थिती कशी ओळखावी, याबद्दल जागरूकता तयार करण्याचे कामही यातून केले जाईल.’

ॲड. दीपक पटवर्धन यांनी गणेश प्रतिमा देऊन चव्हाण यांचा सत्कार केला. २० जून ते २० जुलै ठेववृद्धी मास असून, आजपर्यंत ३५० कोटींच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत. या ठेववृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर ठेव संकलन होईल, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.

स्वरूपांजली ठेव योजना
१२ ते १८ महिने
सर्वसाधारण ८.५०% आणि ज्येष्ठ नागरिक व महिला ९%
सोहम ठेव योजना
१९ ते ३६ महिने (मासिक व्याज)
८.२५% आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ८.५०%

सहकार स्वरूप मासिकाच्या ई-बुकची लिंक : (अँड्रॉइडसाठी) : https://play.google.com/store/books/details?id=-jZmEQAAQBAJ

ई-बुकची लिंक : (आयफोन/वेबसाठी) : https://books.google.co.in/books?id=-jZmEQAAQBAJ

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply