रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने आज भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद, भाट्ये ग्रामपंचायत, फिनोलेक्स, एम. एम. बी.च्या सहकार्याने भाट्ये समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी निवास उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, पंचायत समिती सदस्य अर्चना साळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावखडकर, उपमुख्याधिकारी मयूर बेहरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.
प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून, प्लास्टिक प्रदूषण संपवून पर्यावरणाला हातभार लावा, असे आवाहन करून श्री. सूर्यवंशी यावेळी म्हणाले, समुद्र, नदी, जलस्त्रोत या ठिकाणी आज विशेषत: प्लास्टिक प्रदूषण होत आहे. त्याची स्वच्छता करणे, हे प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून 'एकल प्लास्टिक वापरू नका, एकच ध्यास ठेवू या प्लास्टिक पिशवी हटवू या, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या. वापर टाळू या प्लास्टिकचा जागर करू या' असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण यावेळी करण्यात आले.
मैं अपने कार्यों और जिम्मेदारियों के द्वारा भारत के महासागरों, तटों और समुद्री पारिस्थितिकी तंत्रों की रक्षा एवं संरक्षण करने की प्रतिज्ञा करता/करती हूँ। मैं समुद्र तटों और जल निकायों को स्वच्छ रखूँगा/रखूँगी, कचरा फैलाने और सिंगल-यूज़ प्लास्टिक के उपयोग से बचूँगा/बचूँगी, कचरे का उचित निपटान करूँगा/करूँगी तथा दूसरों को भी ऐसा करने के लिए प्रेरित करूँगा/करूँगी। मैं 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' के विज़न के प्रति स्वयं को समर्पित करता/करती हूँ और वर्तमान तथा भावी पीढ़ियों के लिए एक सतत एवं सुरक्षित भविष्य के निर्माण में अपना योगदान देने का संकल्प लेता/लेती हूँ। जय हिंद अशी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली.
Follow Kokan Media on Social Media

