Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

अरुण फाटक यांना अनोखे मातृत्व पुरस्कार

Advertisements

रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताने अरुण फाटक यांना अनोखे मातृत्व पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांचाच सत्कार होतो. त्यांच्या वैविध्यपूर्ण कामासाठी त्यांना सन्मान केला जातो. पण आस्था संस्थेने आगळ्या वेगळ्या रीतीने आज, १६ मार्च रोजी महिला दिन साजरा केला. मुलांवर मातेसारखी मायेची पाखर घालणारे शिक्षक अरुण फाटक यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी केले. यावेळी धीरज राजेंद्र साटविलकर या आपल्या दिव्यांग मुलाला दिव्यांगत्वावर मात करून जगण्याची उमेद देणाऱ्या आणि त्याच्या पाठीशी ठामपणे राहणाऱ्या सौ. रोहिणी राजेंद्र साटविलकर यांना आस्थाचा यावर्षीचा “सुपर मॉम” पुरस्कार देण्यात आला. धीरजला स्वतःच्या पायात पेन्सिल पकडून त्याला चित्रकला, मातीकाम शिकवणारे त्याचे शिक्षक अरुण धोंडोपंत फाटक यांना अनोखे मातृत्व पुरस्काराने गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि अकराशे रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

मनोगत व्यक्त करताना दोन्ही सत्कारमूर्तींनी धीरजसोबतचा आपला जीवनप्रवास उलगडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती अनघा शिरीष जैतपाल उपस्थित होत्या. स्वागत संपदा कांबळे यांनी, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती साक्षी चाळके यांनी केले. संकेत चाळके यांनी केले. आभार मानले.

कार्यक्रमाला रेणुका प्रतिष्ठानच्या डॉ. रंजना केतकर, अॅडव्होकेट मानसी डिंगणकर, आस्थाचे पालक, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version