Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

एनएसएसचे गणेशगुळे गणपती मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

Advertisements

रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेशगुळे गणपती मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

एनएसएसचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन विद्यामंदिरात सुरू आहे. याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक म्हणजे श्रमदान. गणेशगुळे येथील श्री गणेश मंदिरात ६५ स्वयंसेवकांनी स्वयंभू गणेश मंदिर परिसर, पाखडी, पायवाटेची सफाई केली.

विद्यार्थ्यांना कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजित भिडे, श्रीमती बाणे मॅडम, श्री. घाडगे, मंदिराचे कार्याध्यक्ष विक्रांत रांगणकर व सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी श्री. रांगणकर यांनी गणेश मंदिराचा इतिहास सांगितला. ते कसे स्थापन झाले, याबद्दल माहिती दिली. मंदिर बांधत असताना कोणत्याही प्रकारची अडचण गणपती बाप्पाने कधी येऊ दिली नाही, असेही ते म्हणाले. दरवर्षी या मंदिरात माघी गणशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मोठी जत्रा असते. गणेशगुळ्याचे दर्यावर्दी लोक होड्या, गलबते या माध्यमातून व्यापार व्यवसाय करत असल्यामुळे सुखरूप परत येण्यासाठी गणपतीला नवस करत असत. नवसाला पावत असल्यामुळे ग्रामस्थांची नितांत श्रद्धा आहे. या गणपतीला गलबतवाल्यांचा गपणती म्हणतात. स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. याबद्दल रांगणकर यांनी मंदिरातर्फे सर्वांचे विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version