Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

विद्यार्थ्यांना पूर्णवेळ अभ्यासाकरिता कृष्णज्योत अभ्यासिकेचे उद्घाटन

Advertisements

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना पूर्णवेळ अभ्यासाकरिता अजित राणे यांनी सुरू केलेल्या कृष्णज्योत अभ्यासिकेचे उद्घाटन रत्नागिरीत करण्यात आले.

रत्नागिरीतील मुलांना शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळण्यासाठी शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण असले पाहिजे. बराच वेळ, एक चित्ताने स्वयंअभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृष्णज्योत अभ्यासिका खूपच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी यावेळी केले. माळ नाका येथील केएसपी अॅलेक्सा इमारतीमध्ये अभ्यासिकेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. स्वप्नजा मोहिते, हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकुरदेसाई, उद्योजक गौरांग आगाशे, उदय काजरेकर, सीए नयन सुर्वे, विनायक परब, सौ. पूजा परब, निहारिका परब आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की, ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त असून यानिमित्ताने विद्यार्थी अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल. इथे बसून विद्यार्थी शांतपणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतील. येथे कोणताही व्यत्यय येणार नाही. स्पर्धा परीक्षेत आपण कमी पडतो, ते दूर करण्यासाठी ही अभ्यासिका फायदेशीर आहे.

श्री. राणे म्हणाले की, मला लहानपणी अभ्यास करण्याकरिता शांत जागा शोधावी लागत होती. रत्नागिरीतही अशी स्थिती आहे. सातत्याने किमान आठ ते दहा तास अभ्यास करण्याकरिता तसे वातावरण लागते. यासाठी मी कृष्णज्योत अभ्यासिका सुरू केली आहे. यामध्ये एका वेळी ३० जणांना अभ्यास करता येईल. सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत अभ्यासिका सुरू राहणार असून यात मोफत वाय फाय, एसी, स्वतंत्र टेबल, लॅपटॉप, शैक्षणिक साहित्यासाठी सुविधा दिल्या आहेत. सीसी टीव्ही, इन्व्हर्टर बॅकअप, मुली, महिलांसाठी राखीव जागा, लॉकर, अॅक्वागार्डच्या गार-गरम पाण्याची सुविधाही आहे. करिअरसंदर्भातही मार्गदर्शन केले जाणार असून येथे ग्रंथालयात काही महत्त्वाची पुस्तकेही आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेऊन यश मिळवावे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version