Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाई विलणकर

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण ऊर्फ भाई विलणकर यांची, तर डॉ. चंद्रशेखर केळकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५ ते २०३० या आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड आज जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यातील कुस्ती खेळाला नवी दिशा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कार्य करेल, अशी ग्वाही नव्या कार्यकारिणीने दिली. निवडीमध्ये अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे.

नवीन कार्यकारिणी अशी – अध्यक्ष -श्रीकृष्ण ऊर्फ भाई विलणकर, कार्याध्यक्ष – डॉ. चंद्रशेखर केळकर, उपाध्यक्ष – अमित विलणकर, आनंद तापेकर, प्रमुख कार्यवाह: सदानंद जोशी, सहकार्यवाह – योगेश हर्चेकर, वैभव चव्हाण, खजिनदार – अंकुश कांबळे,
कार्यकारिणी सदस्य – संतोष कदम, सौरभ मलुष्टे, फैय्याज खतीब, राजेंद्र नेवरेकर, आनंदा सनगरे, स्वप्नील घडशी, आनंद दुधाळ, संतोष गोसावी, प्रसाद करमरकर, नीलम कुळकर्णी. निमंत्रित सदस्य – संदेश चव्हाण, अभिषेक पवार, दिलीप कारेकर, मानसिंग पवार, रवींद्र वासुरकर, सुयोग कासार, ऋषीकेश शिवगण, संदीप गुरव, कमल नितोरे. सल्लागार – प्रसाद गवाणकर, श्रीकांत वैद्य, दिनकर पवार, अमित नेवरेकर.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version