राज्य कुस्ती स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाची निवड

रत्नागिरी : जिल्हास्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रत्नागिरीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्य कुस्ती स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली.

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन कुस्ती संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर केळकर यांनी केले. स्पर्धेत जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कुमारगट मुले-मुली, प्रौढ महिला गट, पुरुष वरिष्ठ गट आणि ग्रीको-रोमन अशा गटांत ही स्पर्धा झाली. डाव-प्रतिडावांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला.

स्पर्धेचा निकाल आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले कुस्तीगीर असे – (पुरुष प्रौढ गट) – भावेश प्रमोद सावंत, साहिल सुनील धांगडे, अतुल अरुण गराटे, सोहम प्रभाकर थरवळ, प्रथमेश महादेव कुळ्ये, रोहित राजेश चिले, अर्थव रूपेश घोले, योगेश विजय हरचेकर, साहिल संतोष खटकुल, तेज प्रदीप जावळे, ऋषिकेश रमाकांत शिवगण, आनंद श्रीपती तापेकर, सैफुद्दिन हुसेन पठाण, संस्कार सुहास लटके, पवन अमित साळुंखे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाई विलणकर, सदानंद जोशी, चंद्रशेखर केळकर, अमित विलणकर, संतोष कदम, आनंद तापेकर, वैभव चव्हाण, फैयाज खतीब, अंकुश कांबळे, योगेश हर्चेकर, आनंदा सलगर आदींनी विशेष प्रयत्न केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply