Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन

ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन
Advertisements

राजापूर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राजापूर शाखेतर्फे येत्या २३ नोव्हेंबर रोजी ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या सहकार्याने ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनात शालेय मुलांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याकरिता शालेय विद्यार्थ्यांकडून कविता मागविण्यात आल्या आहेत. कविता स्वरचित असावी. संमेलनात १५ मुलांना कवितावाचनाची संधी देण्यात येईल. शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या कविता १७ नोव्हेंबर २०२६ पूर्वी 9970953600 या व्हॉटस अॅप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय कविता गायन स्पर्धाही होणार असून मराठीतील कोणत्याही कविच्या कवितेचे समूहगायन करता येईल. तबला, पेटी इत्यादींचा वापर करता येईल. प्रथम येणाऱ्या दहा संघांना संधी देण्यात येईल. या संघांनीही आपली नावे १७ नोव्हेंबरपूर्वी पाठवावीत, असे कळविण्यात आले आहे.

या दोन्ही उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून अधिक माहितीसाठी 8668810177 या मोबाइलवर किंवा 9970953600 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version