Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

बिनधास्त कसे बोलायचे? रत्नागिरीत पाच मे रोजी संभाषण आणि वक्तृत्वकलेवर कार्यशाळा

Advertisements

रत्नागिरी : नेटके संभाषण आणि प्रभावी वक्तृत्वकला हे आजच्या जगात अत्यंत आवश्यक असलेले गुण आहेत. छोटीशी सभा, बैठक किंवा एखादा कार्यक्रम अशा ठिकाणी स्टेजवर जाऊन बोलावे लागते. एवढेच नव्हे, तर आजच्या काळात सोशल मीडियावर रील्स किंवा व्हिडिओ करण्यासाठीही चांगले बोलता येणे आवश्यक असते. दोन व्यक्तींमधील संभाषणदेखील समोरच्याचे लक्ष वेधून घेणारे असावे लागते. या सगळ्या गोष्टी शिकवणारी एक कार्यशाळा पाच मे रोजी रत्नागिरीत होणार आहे. ‘बिनधास्त बोलू’ असे या कार्यशाळेचे नाव असून, रत्नागिरीतील उद्योजक, आरजे, लेखक आणि कवी प्रतीक कळंबटे ही कार्यशाळा घेणार आहेत.

आपल्या प्रभावी भाषणाने सभा गाजवायची अनेकांची इच्छा असते. अनेकांना स्वतःविषयी आत्मविश्वास वाटत नसतो. या अनुषंगाने ही कार्यशाळा उपयुक्त ठरू शकेल. वक्तृत्वाची आवड असणाऱ्या व्यक्ती, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार, तसेच ज्यांना मीटिंग आणि कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन द्यावी लागतात अशा व्यक्ती अशा सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयु्क्त ठरू शकेल, असे कळंबटे यांनी सांगितले.

बोलण्यासाठी आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, भाषणाची तयारी कशी करायची, प्रभावी भाषण तयार कसे करावे, सभेमध्ये बोलताना वापरायच्या ट्रिक्स, वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलताना करायचे बदल अशा बऱ्याच बाबींबद्दलची माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. तसेच, प्रात्यक्षिकही करून घेतले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींकडे वैयक्तिक लक्ष देता येण्याच्या दृष्टीने मोजक्याच व्यक्तींना या कार्यशाळेत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रतीक कळंबटे यांनी दिली.

या एकदिवसीय कार्यशाळेचे शुल्क २५०० रुपये असून, १६ वर्षांवरच्या कोणालाही यात सहभाग घेता येईल.

दिनांक : रविवार, पाच मे २०२४
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ४ वा.
शुल्क : रुपये २५०० प्रति व्यक्ती
वयोमर्यादा : १६ वर्षांवरील सर्वांसाठी
स्थळ : हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी

अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क : प्रतीक कळंबटे 9665299329

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version