Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दापोलीत २८ एप्रिलला सायकल स्पर्धा

Advertisements

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सोहनी विद्यामंदिर मैदानावर सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

स्पर्धा १ ते ६० किमी अंतराची असून ३० व ६० किमी कोस्टल सिनिक रूट, शॉर्ट सिटी लूप, फन राइड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय काही खास बक्षिसेही असतील. ६० किमी सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर ते हर्णै, मुर्डी, आंजर्ले, आडे, उटंबर, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. ही स्पर्धा सकाळी पाच वाजता सुरू होईल. स्पर्धकांना ६ तासांत ६० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. राइड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, मेडिकल मदत असेल. शॉर्ट सिटी लूप मार्ग दापोली शहरातील ४ किमीचा असेल. फन राइड विनामूल्य असून सात वाजता सुरू होईल.

स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी फॉर्म विनी इलेक्ट्रिकल-फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल-बाजारपेठ, राऊत सायकल-वडाचा कोंड, परेश बुटाला-जालगाव या ठिकाणी येथे देता येतील. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६ किंवा ९०२८७४१५९५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत सायकल चालवत स्पर्धेत सहभागी व्हावे आणि तंदुरुस्त जीवनशैली अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version