दापोली : दापोली सायकलिंग क्बने येत्या मे महिन्यात विविध वयोगटांकरिता दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ११ आणि १२ मे २०२५ रोजी दापोली समर सायक्लोथॉन सीझन ७ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दापोलीच्या सोहनी विद्यामंदिर मैदानातून ही स्पर्धा सुरू होईल. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यांमधून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.
ही सायकल स्पर्धा १ ते १५० किमी अंतराची असून ३० आणि ५० किलोमीटर कोस्टल सिनिक रूट, ४ ते १५० किलोमीटर शॉर्ट सिटी लूप, १ आणि २ किलोमीटर फन राइड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ५०, ७५, १००, १२५, १५० किमी सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी २००, ३००, ४००, ५००, ६०० रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय इतर काही खास बक्षिसेही देण्यात येणार आहेत. १२ तासात १५० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. ५० किमी कोस्टल सिनिक रूट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णै, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावांमधून असेल. मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.
फन राइड विनामूल्य असून इतर राइडसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी https://www.townscript.com/e/dsc7 या लिंकवर करावी. ऑफलाइन नोंदणीचे अर्ज विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, दत्ता मोबाइल कामगार गल्ली या ठिकाणी उपलब्ध आहेत. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ मे असेल. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७ किंवा ९०२८७४१५९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

