Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संस्कृत विश्वविद्यालयात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Advertisements

रत्नागिरी : येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत घेतला जाणार आहे. या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योग प्रात्यक्षिकांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

हा अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ आपल्याला वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. कामाच्या व्यस्ततेतून आपल्या आरोग्यासाठी वेळ देण्याची सुवर्ण संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. इच्छुकांनी ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क त्वरित साधावा. तसेच खालील लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
https://forms.gle/9beGKFyu7hzipDBA7

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version