संस्कृत सप्ताहानिमित्त संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रम

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे संस्कृत महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘गीता-वेदांत परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ घेण्यात येणार असून, यामध्ये भगवद्गीता व भारतीय तत्त्वज्ञानातील निवडक संकल्पनांचा प्राथमिक परिचय दिला जाईल. ‘स्तोत्र पठण वर्गा’त गणेशपंचरत्न स्तोत्रम्, शिवाष्टकम्, विष्णुषोडशनामस्तोत्रम्, पांडुरंगाष्टकम्, नवग्रहस्तोत्रम्, सरस्वतीनामस्तोत्रम् आणि गुर्वाष्टकम् ही लोकप्रिय स्तोत्रे शिकवली जाणार आहेत. सायंकाळी ४.४५ ते ५.३० या वेळेत ‘संस्कृत भाषा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ पार पडणार असून, यात संस्कृत सुभाषिते, संभाषण, संस्कृत साहित्य आणि संस्कृत कथा यांचा प्राथमिक अभ्यास केला जाणार आहे. हे तिन्ही अभ्यासक्रम १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या काळात दररोज सायंकाळी ४.०० ते ४.४५ या वेळेत होतील.

तिन्ही अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सहभागींस अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम पूर्णतः निशुल्क असून offline पद्धतीने रत्नागिरीतील अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्थानकाजवळील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे उपकेंद्र येथे पार पडणार आहेत.

नोंदणीसाठी इच्छुकांनी https://forms.gle/qcqPHuDqnQSm2Wda7 या लिंकवर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रा. अविनाश चव्हाण (८३९०८५४९२६) आणि स्वरूप काणे (७२१९०५४०९७) यांच्याशी संपर्क साधावा.

या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी, संस्कृतप्रेमींनी आणि तत्त्वज्ञान व स्तोत्रांमध्ये रस असणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.
०००००००००००००००००००

निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम

संस्कृत सप्ताहानिमित्तानेच निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमही आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. हा अभ्यासक्रमही भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातच होणार आहे.

नोंदणीसाठी https://forms.gle/D3cqWXj5NsCuqEQe8 या लिंकवर किंवा प्रा. अक्षय माळी (7798490615) यांच्याशी संपर्क साधावा. हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून, योगामध्ये रस असणाऱ्या विशेषतः महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply