दीप अमावास्येनिमित्त अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सुवर्णदुर्गाभोवती उजळले दीप

रत्नागिरी : येथील केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दीप अमावास्येनिमित्त जागतिक वारसास्थळांत नोंद झालेल्या दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचे चित्र रेखाटून त्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिव्यांचे महत्त्व कळण्यासाठी दर वर्षी असा उपक्रम राबवण्यात येतो. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
गुरुवारी (२४ जुलै) सकाळी कलाशिक्षक श्री. वाडिये यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचे चित्र साकारले. त्याभोवती तेलाचे दिवे, पणत्या, मेणबत्त्या, समई असे विविध प्रकारचे दिवे लावण्यात आले. विद्यार्थी, पालक प्रतिनिधी आणि शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी सांगितले, की ‘मूकबधिर विद्यालयात दर वर्षी दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन केले जाते. दर वर्षी वेगवेगळे चित्र काढून त्याभोवती दीप प्रज्वलित करतो. यंदा सुवर्णदुर्गाचे चित्र रेखाटून त्याभोवती दिवे प्रज्वलित केले आहेत. विद्यार्थ्यांना सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहितीसुद्धा देण्यात आली. सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होवो अशा शुभेच्छा दिल्या.’



Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply