रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषांच्या तायक्वांदो स्पर्धेत मुंबईतल्या माटुंगा इथल्या गुरुनानक खालसा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. वाशी – पालघर इथल्या विद्यावर्धिनी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाने उपविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. रत्नागिरीतल्या गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात ही स्पर्धा झाली.
स्पर्धेचं बक्षीस वितरण मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या हस्ते झालं. या वेळी तायक्वांदो निवड समिती सदस्य डॉ. विश्वंभर जाधव, तायक्वांदो आंतरराष्ट्रीय रेफ्री व राष्ट्रीय फेडरेशनचे संचालक सुभाष पाटील, गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आदी उपस्थित होते. सविस्तर निकाल असा – ५४ किलोखालील गट – सुवर्णपदक – अविनाश राऊळ (जोशी – बेडेकर महाविद्यालय, ठाणे), रजत – वेदांत धाडके (वर्तक, मल्होत्रा अँड्रुज महाविद्यालय, वसई). कांस्य – आकाश डापसे (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा) व श्रीधर मलिक (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा). ५८ किलोखालील गट – सुवर्ण – देवेश बाह्मणे (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत – नमन दवे (वर्तक, मल्होत्रा,अॅंड्रुज महाविद्यालय, वसई), कांस्य – अथर्व मांडे (सेंट जॉन कॉलेज, पालघर), कांस्य – स्वानंद कुलकर्णी (द एस.आय.ए. महाविद्यालय डोंबिवली). ६३ किलोखालील गट – सुवर्णपदक – श्रीजय भगत (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत – शार्दुल शेडगे (के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट, सायन), कांस्य जय वारुंग (सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट, बोरीवली), कांस्य – अमर्त्य पोल (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा). ६८ किलोखालील गट सुवर्ण – शाहिद शेख (गुरु नानक महाविद्यालय, माटुंगा), रजत – ओम कदम (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), कांस्य देवेन सुपल (गोगटे – जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), कांस्य अजय चौहान (अग्रवाल महाविद्यालय, कल्याण). ७४ किलोखालील गट – सुवर्ण – आर्यन येवले (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजतपदक – प्रेम पाटणे (विद्याधिराज महाविद्यालय, न्यू पनवेल), कांस्य – विराज गवस (सेंट झेव्हियर्स कॉलेज महापालिका मार्ग), कांस्य शिवम ताम्हणकर (झुंझुनवाला कॉलेज, घाटकोपर). ८० किलोखालील गट – सुवर्ण निहाल भोईर (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत विराज साऊळ (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), कांस्य आदित्य पाठक (ठाकूर कॉलेज कांदिवली), कांस्य – उत्कर्ष मिश्रा (पिल्लाई महाविद्यालय खालापूर). ८७ किलोखालील गट – सुवर्ण प्रसाद पाटील (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत – रुद्र जंगम (आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूण) कांस्य – सूरज गमरे (बेहरे, शेठ महाविद्यालय, खेड), कांस्य – वेदांत दरेकर (पिल्लाई महाविद्यालय, न्यू पनवेल). ८७ किलोवरील गट – सुवर्ण श्रीनिधी काटकर (गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा), रजत – शिवंश यादव (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा), कांस्य दिब्यांशू चौहान (सोमय्या कॉलेज विद्याविहार), कांस्य सुनय मुखर्जी (बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण).
Follow Kokan Media on Social Media

