दीप अमावास्येनिमित्त अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सुवर्णदुर्गाभोवती उजळले दीप

रत्नागिरी : येथील केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दीप अमावास्येनिमित्त जागतिक वारसास्थळांत नोंद झालेल्या दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचे चित्र रेखाटून त्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले.

का साजरी करतात दीप अमावास्या?

आज, १७ जुलैला आषाढी अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या आहे. ही तिथी का साजरी केली जाते?

दीपपूजनाचे औचित्य साधून कन्येचा वाढदिवस!

आषाढ अमावास्येला दीपपूजन करतानाच दीपिकारूप कन्येचा वाढदिवस साजरा करून लांज्यातील दांपत्याने या सणाचे वेगळेपण सिद्ध केले.

अभ्यंकर विद्यामंदिराने जपली दीप अमावास्येला दिव्यांच्या प्रदर्शनाची प्रथा

आषाढ अमावास्या तथा दीप अमावास्येचे औचित्य साधून रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात प्राचीन काळापासूनच्या दिव्यांचे प्रदर्शन दर वर्षी मांडण्यात येते. २० जुलै रोजी दीप अमावास्या आहे; पण करोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रदर्शनाचा आढावा घेणारा एक व्हिडिओ शाळेने सर्व विद्यार्थ्यांना पाठवला आहे आणि या प्रदर्शनाच्या प्रथेत खंड पडू दिलेला नाही.