रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात नि:शुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. त्याला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला.
हा योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम मोफत आहे. त्यामुळे केवळ वेळेची गुंतवणूक करणारे ५० जण अभ्यासक्रमाच्या उद्घाटन सत्रात २२ जुलै रोजी पहिल्याच दिवशी उपस्थित होते. अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या २२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
रत्नागिरीतील नागरिकांना योगशास्त्राचे पद्धतशीर शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे आणि योगाविषयीची त्यांची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या अभ्यासक्रमागील उद्देश आहे. अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत योगाच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ करा, असा मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मीरा दळी, योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. हा अभ्यासक्रम अरिहंत मॉल येथील रत्नागिरी उपकेंद्रात सुरू आहे. या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योगप्रकारांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

