रत्नागिरीत २२ जुलैपासून मोफत योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम

रत्नागिरी : येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२४ या एक महिन्याच्या कालावधीत सायंकाळी ५ ते ६ या वेळेत घेतला जाणार आहे.

कामाच्या व्यस्ततेतून जरा वेळ आरोग्यासाठी रत्नागिरीकरांना देण्याची ही सुवर्णसंधी आहे. हा अभ्यासक्रम अरिहंत मॉल येथील रत्नागिरी उपकेंद्रात होणार आहे. या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योगप्रकारांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे.
अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply